…तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा – राज ठाकरे

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा वापर बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. याबाबत राज ठाकरेंनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबुज सुरु […]

…तर सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा – राज ठाकरे

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा वापर बंद होणार नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

याबाबत राज ठाकरेंनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याची कुजबुज सुरु झाली.

त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दाव्याला पुष्टी मिळत गेली.

जर येत्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हीव्हीपॅट अथवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर “सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय पक्षांना पत्राद्वारे केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number