गरजूंना मदत करण्यासाठी जॉनने उचलले मोठे पाऊल

कोरोनाची दुसरी लाटेमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही आहे. औषधीची तुटवडा निर्माण होत आहे. कोरोना काळात अनेकजण भारताच्या मदतीसाठी समोर आले आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील मदतीचा हात समोर केला असून आणखी एक कलाकार आता जोडला गेला आहे. बॉलिवूड […]

गरजूंना मदत करण्यासाठी जॉनने उचलले मोठे पाऊल

कोरोनाची दुसरी लाटेमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही आहे. औषधीची तुटवडा निर्माण होत आहे. कोरोना काळात अनेकजण भारताच्या मदतीसाठी समोर आले आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील मदतीचा हात समोर केला असून आणखी एक कलाकार आता जोडला गेला आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सोशल मीडियाचा वापर करत सगळ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. जॉनने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट हे स्वयंसेवी संस्थांच्या हाती सोपविले आहे. जेणेकरून कोरोनाच्या काळात ज्या लोकांना अशा गोष्टींची गरज आहे. त्यांना वस्तू मिळण्यास मदत होईल. जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे.

“एक देश म्हणून आपण अतिशय भीषण परिस्थितीचा अनुभव घेत आहोत. प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि लस आणि कधी अन्न न मिळणाऱ्या लोकांची संख्या ही वाढताना दिसत आहे. तर, अशा कठीण परिस्थितीत अनेक लोक एकत्र येऊन, एकमेकांना मदत करत आहेत, गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असे जॉन म्हणाला. जॉन पुढे म्हणाला, “आजपासून माझं सोशल मीडिया हे स्वयंसेवी संस्था वापरतील. देशभरातील इतर अनेक संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. माझ्या अकाऊंटवरून केलेल्या पोस्ट या लोकांना लागणाऱ्या वस्तू त्यांना कुठे मिळतील हे सांगण्यासाठी असतील. या संकटावर मात करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पुढे येण्याची ही वेळ आहे. जीव वाचवण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी आपण एकत्र असणं गरजेच आहे. त्यासाठी घरीच राहा, सुरक्षित रहा. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी जबाबदार रहा,” अशा आशायाची पोस्ट जॉनने केली आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २७ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number