#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM
#हेडलाइन पेट्रोल-डिझेलच्या दराचा उच्चांक…पेट्रोल 19 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरात 22 पैशांनी वाढ #हेडलाइन ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुपारी 12 ते 2 वाहतूक राहणार बंद…..शेडुंग फाटा येथून वाहतूक वळवणार… #हेडलाइन एल्गार परिषदे प्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळे आणि शोमा सेन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी….कोर्टातील युक्तीवादाकडे सगळ्यांचं लक्ष… #हेडलाइन समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 च्या वैधतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी….ऐतिहासिक सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष… #हेडलाइन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे घाबरण्याची गरज नाही….केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं स्पष्टीकरण… #हेडलाइन भिवंडीत चोरट्यांनी दुकानातून ८६ हजार ४७२ रुपयांचे मोबाईल केले लंपास…घटना सीसीटीव्हीत कैद #हेडलाइन कल्याण-नगर महामार्गावर पिंपरी पेंढार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू…दोन दिवसातील बिबट्याच्या मृत्यूची दुसरी घटना #हेडलाइन राज्य सरकारकडे स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती जय महाराष्ट्रच्या हाती…पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरात 12 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल… #हेडलाइन लवकरच सुरु होतंय सलमान खानच्या बिग बॉसचं नवं पर्व … ‘विचित्र जोडी’ अशी थीम असणारा बिग बॉस 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला #हेडलाइन अभिनेता शाहिद कपूर पुन्हा पिता झाला, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्र प्राप्ती #हेडलाइन गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या..खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी