#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM
#हेडलाइन मुंबईसह ठाण्यात पावसाची विश्रांती, पण आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
#हेडलाइन पालघरच्या केळवे समुद्रात बुडालेल्या चारपैकी दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला, आणखी दोघांचा शोध सुरू
#हेडलाइन कोल्हापुरात चंदगड – बोरिवली शिवशाही बसला अपघात, 13 जण जखमी
#हेडलाइन वर्धातील आर्वीमध्ये बनावट नोटा तयार करणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अटकेत, बनावट नोटा तयार करणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता
#हेडलाइन कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नेते सक्रीय मात्र शिवसेना, राष्ट्रवादीच्या मेळाव्यांकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
#हेडलाइन गौरी लंकेश हत्येप्रकरणी नवा खुलासा, परशुराम वाघमारेला हत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर, मुन्नानं मारण्याची सुपारी दिल्याचा एसआयटीकडे वाघमारेचा खुलासा
#हेडलाइन मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाच्या नव्या प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण, मध्य रेल्वेच्या प्रवशांना ऐन गर्दीच्या वेळी मोठा दिलासा
#हेडलाइन फिफा वर्ल्डकपमध्ये मेक्सिकोने जगज्जेत्या जर्मनीचा केला पराभव तर स्वित्झर्लंड – ब्राझील सामना ठरला 1 – 1 नं अनिर्णित