#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @5.00 PM
#हेडलाइन ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये हिंसाचार… अनंतनागमध्ये हिंसक जमावानं सुरक्षा दलाच्या गाडीवर दगडफेक करत जवानांवर केला जीवघेणा हल्ला… जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्यांचा वापर…
#हेडलाइन जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार… खांदेपालट होण्याची शक्यता.. आमदार संजय कुटेंची वर्णी लागण्याचीही चर्चा…
#हेडलाइन पगडीबाबत कोणाच्याही भावना दुःखवण्याचा हेतू नव्हता… वादानंतर पवारांचं स्पष्टीकरण…
#हेडलाइन भाजप आमदार प्रशांत बंब यांचा पोलीस उपनिरीक्षकाला दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल… कार्यकर्त्याची गाडी पकडल्यानं बंब संतप्त झाल्याची चर्चा…
#हेडलाइन बदलापूच्या ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना दुर्दैवी मृत्यू… ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास ट्रेकर हर्षद आपटेंच्या जीवावर बेतला…
#हेडलाइन मागासवर्गीय मुलांना नग्न करुन केलेल्या मारहाण प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री आठवले वाकडी गावात… राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितांची घेतली भेट…
#हेडलाइन औरंगाबादनंतर जळगावातही चोरीच्या संशयावरुन मारहाण… चाळीसगावात सहा तृतीयपंथीयांना बेदम मारहाण… मुले पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी दिला चोप…
#हेडलाइन संपत्तीसाठी पोटच्या मुलानं आईवडिलांना नारळ पाण्यातून दिलं विष… लातूरमधील धक्कादायक घटना… वडिलांचा मृत्यू, आईवर उपचार सुरू तर आरोपी मुलगा गजाआड…
#हेडलाइन देशभरात उत्साहात ईद साजरी… नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी, तर येवल्यात छगन भुजबळांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा…
#हेडलाइन फिफा वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी अर्जेंटिना विरुद्ध आइसलॅंड, फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशिया विरुद्ध नायजेरिया संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार…