#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @10.00 AM
#हेडलाइन मुंबईकरांच्या पाण्याच्या दरात वाढ, मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्के वाढ, उद्यापासून दरवाढ लागू
#हेडलाइन एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के दरवाढ, इंधन दरवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
#हेडलाइन नाशिक – दिल्ली विमानसेवेची प्रतीक्षा संपली, आजपासून सुरू होणार विमानसेवा, दुपारी नाशिकहून दिल्लीसाठी पहिल्या विमानाचं टेकऑफ
#हेडलाइन देशातील मालवाहूतक ट्रक 18 जूनपासून बंद, इंधन दरवाढ, टोल शुल्कवाढीविरोधात ट्रक मालकांची चक्काजामची हाक
#हेडलाइन अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका क्षेत्रात मिळणार 269 फुटांचं मोफत घर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सदनिका नसल्यास रेडिरेकनर दरानुसार रोख एकरकमी मोबदला देणार
#हेडलाइन 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कात प्रवेश, मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचा निर्णय, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा
#हेडलाइन ठाणे सिव्हिल रुग्णालयात स्वीपरकडून महिलेचा विनयभंग, महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
#हेडलाइन मुंबईत ट्रकला अपाघात, कुर्ला वाशी फ्लायओव्हरवर उलटला ट्रक, जीवितहानी नाही
#हेडलाइन मराठी नाट्यसंमेलनाचा आज समारोप, अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत होणार नाट्यसंमेलनाची सांगता
#हेडलाइन आज फिफा वर्ल्ड कपमध्ये रंगाणार 3 संघामध्ये लढती, इजिप्त विरुद्ध उरुग्वे, मॉरोक्को विरुद्ध इऱाण तर पोर्तुगाल विरुद्ध स्पेनची लढत तर सलामीच्या लढतीत यजमान रशियाने सौदी अरेबियाचा 5 – 0 ने उडवला धुव्वा