…तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकणार- जितेंद्र आव्हाडांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   31 जुलैची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेलं मुंबई विद्यापाठी 5 ऑगस्ट म्हणजेच आजची डेडलाईन पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. 31 जुलैला 171 अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात आले.   मात्र, उर्वरित 306 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होणं बाकी होतं. त्यामुळे आजतरी हे निकाल लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.   याआधी […]

…तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकणार- जितेंद्र आव्हाडांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

31 जुलैची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेलं मुंबई विद्यापाठी 5 ऑगस्ट म्हणजेच आजची डेडलाईन पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. 31 जुलैला 171 अभ्यासक्रमांचे निकाल लावण्यात आले.

 

मात्र, उर्वरित 306 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होणं बाकी होतं. त्यामुळे आजतरी हे निकाल लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

याआधी मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत लागणार असल्याची कबुली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम ए खान यांनी जय महाराष्ट्राला दिली होती.

 

निकाल लागवण्यात मुंबई विद्यापीठ अपयशी ठरल्यानंतर अनेक स्तरावरून मुंबई विद्यीठाच्या कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तर आजही निकाल लागले नाही तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number