जितेंद्र आव्हाडांनी गायली ‘विष्णूंच्या अकराव्या अवतारा’ची आरती!

  विरोधक सातत्याने भाजपवर राफेल डीलसंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप करत आहेत. अंबानी यांना कॉण्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केल्याचाही आरोप सरकारवर विरोधकांकडून होत आहे. अशातच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णूचा अकरावा अवतार म्हटल्याने त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या स्टाईलने […]

जितेंद्र आव्हाडांनी गायली ‘विष्णूंच्या अकराव्या अवतारा’ची आरती!

 

विरोधक सातत्याने भाजपवर राफेल डीलसंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप करत आहेत. अंबानी यांना कॉण्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केल्याचाही आरोप सरकारवर विरोधकांकडून होत आहे. अशातच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णूचा अकरावा अवतार म्हटल्याने त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या स्टाईलने समाचार घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नवरात्रीमध्ये आरती गायली आहे. मात्र ही आरती कुणत्याही देवीची नसून चक्क पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत रचलेली आरती आहे. या विडंबनात्मक आरतीमध्ये राफेल डील, अंबानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. 

 

येइयो अंबानी माझे माउली ये ।।

येइयो अंबानी माझे माऊली ये !!!

अकरावा आवतार रफेल वर स्वार होसी!!

अंबानी ला घेऊन तो फ्रान्स ला जासी !

डसाल्ट कंपनीचे तयाला कॉण्ट्रॅक्ट मिळवून देसी।

दोघे मिळोनी भारत देश विकाया नेशी!!!

येइयो अंबानी माझे माउली ये ।।

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number