जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चाही झाली. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. मात्र, आपली भेट ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीपूर्वी ही भेट झाल्याने आव्हाड शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात […]

जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चाही झाली. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. मात्र, आपली भेट ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीपूर्वी ही भेट झाल्याने आव्हाड शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेटले होते का यासंदर्भात त्यांना विचारणा केली. मात्र यावर आव्हाड यांनी उत्तर देताना अशा गोष्टी आपल्या अवाक्याबाहेर आहेत. तरी फॅसिजमशी सामना करण्यासाठी शिवसेनेने महाआघाडीत यावं, अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे हिंदुत्ववादी पक्षांविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेण्याबद्दल ओळखले जातात. तर शिवसेनाही आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून आव्हाड यांच्यावर सातत्याने टीका करत असते. अशावेळी आव्हाड यांची मातोश्रीवरील भेट ही अनेकांसाठी चकीत करणारी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number