जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास तज्ज्ञ नाहीत आणि म्हणून आमचा शिवसृष्टीला विरोध असल्याचं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
बाबासाहेब पुरंदरेच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्यात शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच बदनामी करणार लेखन करण्यात आलंय. शिवसृष्टी म्हणजे शिल्पकला आहे त्यातही असं लिखाण केलं जाईल आणि म्हणून आमचा विरोध असल्याचं आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र सरकारनं तज्ज्ञची समिती बनवून शिवसृष्टी पुढे आणली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तर, आमचा विरोध शिवसृष्टीला नाही तर बाबासाहेब पुरंदरे निर्मित शिवसृष्टीला आहे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.