आकाश अंबानीची, जिओ युजर्सला भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रिलायन्स जियो युजर्ससाठी आणखि एक आनंदाची बातमी आहे. जिओ टीव्ही ने घोषणा केली आहे, की श्रीलंकेत सुरु असलेल्या ट्रायसीरिज दरम्यान, जिओ युजर्स, निडास ट्रॉफीचा आनंद हव्या त्या वेळी घेऊ शकतात. जिओ कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधेच्या माध्यमातून, जिओ युजर्स आपल्या इच्छेनुसार प्रत्येक अँगलने मॅच पाहू शकतील. तीन देशांच्या क्रिकेट सिरिज दरम्यान मैदानातील मॅच कुठल्या कॅमेऱ्याने आणि कोणत्या अँगलने […]

आकाश अंबानीची, जिओ युजर्सला भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रिलायन्स जियो युजर्ससाठी आणखि एक आनंदाची बातमी आहे. जिओ टीव्ही ने घोषणा केली आहे, की श्रीलंकेत सुरु असलेल्या ट्रायसीरिज दरम्यान, जिओ युजर्स, निडास ट्रॉफीचा आनंद हव्या त्या वेळी घेऊ शकतात.

जिओ कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधेच्या माध्यमातून, जिओ युजर्स आपल्या इच्छेनुसार प्रत्येक अँगलने मॅच पाहू शकतील. तीन देशांच्या क्रिकेट सिरिज दरम्यान मैदानातील मॅच कुठल्या कॅमेऱ्याने आणि कोणत्या अँगलने पहायची आहे याची निवड युजर्स करु शकतात. युजर्स पाच वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने मॅचचा आनंद घेऊ शकतात.

कोणत्या भाषेत कमेंन्ट्री ऐकायची आहे याची निवड युजर्स करु शकतात. सध्याच्या स्थितीत असलेल्या प्रेक्षकांच्या संख्येत भर पडावी, म्हणून त्यांच्या भाषेत अनुवाद केला जात आहे. हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये, युजर्स क्रिकेटची कॉमेंट्री ऐकू शकतील. जहीर खान, आशीष नेहरा आणि गौरव कपूर सारख्या विश्लेषकांकडून विश्लेषण तसेच कॉमेंट्री ऐकू शकतात. तसेच स्टम्प, माईक आणि स्टेडिअममधील प्रेक्षक आणि सभोवतालच्या ऑडिओचा अनुभवही घेऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक क्षेत्रातील ग्राहकांचा अनुभव उत्तम राहावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मुकेश अंबानी यांचे थोरले चिरंजीव आकाश अंबानी यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number