जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
टेलिकॉम कंपन्यांमध्ये खळबळ उडवणाऱ्या जिओने ग्राहकांसाठी आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. जिओ ग्राहक सध्या जिओच्या धन धना धन ऑफरचा लाभ
घेत आहेत. त्यानंनर जिओने 1500 रुपयांचा 4G volet फोन आणला.
तर आता जिओने आणखी एका ऑफरने ग्राहकांना खुश केले आहे. जिओच्या या ऑफरमध्ये जिओ 380 जीबी डेटा 7 महिन्यांसाठी देणार आहे. 210 दिवसांची व्हॅलिडीटी
असणाऱ्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 4999 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ अप्ससोबतच, कॉलिंग, रोमिंग्स ची सुविधा यामध्ये ग्राहकांना मिळणार
आहे.
जिओची धन धना धन ऑफर सुरु असतानाच जिओनं 7 महिन्यांसाठी 380 जीबी डेटाची ऑफर लॉंच केल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांनी जिओची धास्ती घेतली आहे.
ग्राहकांसाठी लवकरच ही ऑफर सुरु होणार आहे.