RSS आणि भाजप पक्षानेच माझ्यावर हल्ला केला; दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा आरोप

वृत्तसंस्था, अहमदाबाद   गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार करत असताना दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. सुदैवाने या हल्ल्यात मेवाणी यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये. मात्र, या हल्ल्यात ठाकोर सेनेचा एक कार्यकर्ता जखमी झालाय. मेवाणी यांनी या हल्ल्याची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिलीये.  हा हल्ला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला […]

RSS आणि भाजप पक्षानेच माझ्यावर हल्ला केला; दलित नेते जिग्नेश मेवाणी यांचा आरोप

वृत्तसंस्था, अहमदाबाद

 

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार करत असताना दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर हल्ला करण्यात आलाय.

सुदैवाने या हल्ल्यात मेवाणी यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये. मात्र, या हल्ल्यात ठाकोर सेनेचा एक कार्यकर्ता जखमी झालाय.

मेवाणी यांनी या हल्ल्याची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिलीये.  हा हल्ला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला असल्याचा आरोप मेवाणी यांनी केलाय.

मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरच्या तकरवाडा येथे जनसंपर्क साधत होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या रॅलीवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number