जायकवाडीचा पाणीसाठा 99 टक्क्यांवर पोहाचल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नगर नाशिकवरून हे पाणी सोडण्यात आले आहे. पैठण जलविद्युत केंद्रातुन गोदावरीच्या नदीपात्रात 1589 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग होणार आहे.
नगर, नाशिकवरून सोडण्यात आलेल्या पाण्याने जायकवाडी धरण 99 टक्के भरले असून दुपारनंतर गोदावरीच्या नदी पत्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीत 12 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पैठण जलविद्युत केंद्रातुन 1589 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तर आता जायकवाडीचा पाणीसाठा वाढल्याने आसपासच्या गावांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.