Earthquake: ‘या’ ठिकाणी 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी; तीन मीटर उंच लाटा धडकण्याचा इशारा

तीन मीटरपर्यंत उंच लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

Earthquake: ‘या’ ठिकाणी 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! त्सुनामीचा हाय-अलर्ट जारी; तीन मीटर उंच लाटा धडकण्याचा इशारा

जपानच्या उत्तर भागात सोमवारी 20 एप्रिल 2026 रोजी 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या धक्क्यांनंतर तातडीने त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. जपान मधील इवाते, आओमोरी आणि होक्काइडो या किनारी भागांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

जपान हवामान विभागाने काही भागांमध्ये तीन मीटरपर्यंत उंच लाटा येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी किनारपट्टीजवळील नागरिकांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. त्सुनामीच्या लाटा एकदाच न येता वारंवार येऊ शकतात, त्यामुळे इशारा मागे घेतला जाईपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळीच थांबावे, असे सांगण्यात आले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात, इवाते किनाऱ्याजवळ सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपाचे धक्के टोकियोपर्यंत जाणवले. जपानी तीव्रता मापन पद्धतीनुसार हा भूकंप “उच्च 5” श्रेणीत नोंदवला गेला असून, अशा तीव्रतेमुळे भिंती कोसळणे आणि इमारतींना नुकसान होण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Best Mileage Bikes: पेट्रोलच्या वाढत्या दराची चिंता सोडा! 'या' स्वस्त बाइक्स देतात 70 किलोमीटरपर्यंत मायलेज; पाहा नावे आणि किमती

सुरक्षेच्या कारणास्तव आओमोरी भागातील बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच सरकारने आपत्कालीन पथक सक्रिय केले असून किनारी भागातील बंदरांमधून जहाजे बाहेर काढण्यात येत आहेत. ओनागावा अणुऊर्जा केंद्रासह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

जपान हा पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” क्षेत्रात असल्याने जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो. येथे दरवर्षी सुमारे 1,500 भूकंप होतात. 2011 मध्ये आलेल्या 9.0 तीव्रतेच्या भूकंप आणि त्सुनामीत 18,500 लोक मृत्युमुखी पडले किंवा बेपत्ता झाले होते, तसेच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली होती. 

हेही वाचा: India-Russia Defense Pact: जागतिक महासत्तांना धक्का! भारत-रशिया संरक्षण कराराने धास्तावले चीन-अमेरिका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number