…म्हणून मंत्र्यांनी केला चर्चगेट ते अंधेरी लोकलच्या सेकंड क्लासने प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंत्री म्हणजे डोळ्यासमोर येतो तो त्यांचा मोठा लवाजमा, त्यांचे सिक्युरिटी गार्ड्. मात्र, या सगळ्या गोष्टींना फाटा देत एखादे मंत्रीमहोदय चक्क लोकलने प्रवास करताना दिसले तर?   ऐकून आश्चर्य वाटतंय ना पण हे खरं आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकरांनी चक्क मुंबईच्या लोकलमधून प्रवास केला.   दुपारी अडीचच्या सुमारास […]

…म्हणून मंत्र्यांनी केला चर्चगेट ते अंधेरी लोकलच्या सेकंड क्लासने प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्री म्हणजे डोळ्यासमोर येतो तो त्यांचा मोठा लवाजमा, त्यांचे सिक्युरिटी गार्ड्. मात्र, या सगळ्या गोष्टींना फाटा देत एखादे मंत्रीमहोदय चक्क लोकलने प्रवास करताना

दिसले तर?

 

ऐकून आश्चर्य वाटतंय ना पण हे खरं आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकरांनी चक्क मुंबईच्या लोकलमधून प्रवास केला.

 

दुपारी अडीचच्या सुमारास मंत्रालयातील 3 बैठका संपावून जानकरांना अंधेरी जवळच्या वर्सोव्यामध्ये फिशरी संस्थेला भेट द्यायची होती.

 

त्यामुळे मात्र लव्याजम्यासकट कारनं जायचं तर ट्रॅफिक आणि खड्ड्यांचा सामना करावा लागणार. त्यामुळे या सगळ्याला फाटा देत त्यांनी चर्चगेट ते अंधेरीपर्यंत

लोकलमधून प्रवास केला आणि तोही चक्क सेकंड क्लास मधून. चक्क एका मंत्र्याला रेल्वेप्रवास करताना पाहून सामान्यांच्या भूवया उंचावल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number