आईसाठी जान्हवी कपूरचे हृदयस्पर्शी पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबईदुबईत लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवींचा बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला. शनिवारी बॉलिवूडची चांदनी जगाला पाठी टाकून निघून गेली. मुंबईत अभिनेत्री श्रीदेवी यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थित लावली होते. बोनी कपूर, मोठी मुलगी जान्हवी आणि खूशी त्याच दुखात आहेत असं चित्र समोर आलं […]

आईसाठी जान्हवी कपूरचे हृदयस्पर्शी पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दुबईत लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवींचा बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला. शनिवारी बॉलिवूडची चांदनी जगाला पाठी टाकून निघून गेली. मुंबईत अभिनेत्री श्रीदेवी यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी आपली उपस्थित लावली होते.

बोनी कपूर, मोठी मुलगी जान्हवी आणि खूशी त्याच दुखात आहेत असं चित्र समोर आलं आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबतच एक पत्र देखील तिने सोशल मिडीयावर टाकल आहे.

जान्हवीने तिच्या आईला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. ते हृदयस्पर्शी आहे की ते वाचता वाचता डोळ्यातक पाणी आल्याशीवाय राहणार नाही. माझी आई संपूर्ण कुटुंबाची ताकद होती, कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या ती सांभाळत होती, असं जान्हवीने पत्रात म्हटलं आहे. तसंच पत्रात जान्हवीने सगळ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी आभारही मानले आहेत.

“वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते…तुमच्या आई-वडिलांवर नितांत प्रेम करा. त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याबद्दल समर्पित भावना ठेवा. माझ्या आईला तुम्ही प्रेमपूर्वक लक्षात ठेवा. तिच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम हीच होती, जी ती माझे वडील बोनी कपूर यांच्यासोबत नेहमी शेअर करायची. तिचं प्रेम अमूल्य होतं. या दोघांच्या प्रेमाची तुलना जगात दुसऱ्या कशासोबतही होऊ शकत नाही. त्याचा आदर करा. त्यांच्या प्रेमाला कुणी गालबोल लावण्याचा प्रयत्न करेल, ही कल्पना करुनही खूप त्रास होतो. त्यांच्या प्रेमाचं पावित्र्य राखा. फक्त आईसाठीच नाही तर माझ्या बाबांसाठीही. मी आणि खुशीने आई गमावली आहे, पण माझ्या बाबांनी त्यांचं सर्वस्व गमावलं आहे.

माझी आई एक गुणी अभिनेत्री, चांगली आई आणि आदर्श पत्नी तर होतीच, पण त्यापलिकडे ती उत्तम माणूस होती. तिने प्रत्येक भूमिका चोख वठवली. तिने इतरांना प्रेम दिलं आणि बदल्यात तिला प्रेम मिळत गेलं. द्वेष, तिरस्कार या गोष्टींचा तिच्यावर कधीही परिणाम झाला नाही. प्रेम हीच जगातील शाश्वत गोष्ट आहे. तेव्हा प्रेम करत राहा. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही या कठीण प्रसंगात स्वत:ला सावरु शकलो.”

 

 

Untitleduy.png

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number