कोकणातील सर्वात मोठी जांभूळ निर्यात करणारी बाजारपेठ जाभळाविना सुनी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मधील आकेरी गावात जाभंळाची बाजारपेठ आहे .ही कोकणातील सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. यावर्षी जांभूळ पीक अत्यल्प आल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी जांभूळवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगला फटका बसला आहे. जांभूळ प्रक्रिया उद्योग बंद पडले आहेत. तर शेतकरी आणि व्यापारी जांभूळ पीक न आल्याने आर्थिक संकटातचं सापडले आहेत. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कोकणात जाभूळ पीक अत्यल्प आलं आहे.
केवळ १० ते १२ टक्के आलेले पीक हि अवकाळी पावसामुळे वाया गेले आहेत.त्यामुळे कोकणातील जाभूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सिंधुदुर्गात २०० ते २५० शेतकरी जाभूळ चं उत्पादक घेणारे शेतकरी आहेत. कोकणातील आकेरी गावातील या बाजारपेठेतुन मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या मोठ्या बाजारपेठेत जांभूळ निर्यात केली जात होती . मात्र यावर्षी जांभूळ पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याचा फटका जांभूळ उत्पादकांना बसला आहे. सिंधुदुर्गात कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात जांभूळ चं उत्पादन घेतले जाते.