भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर,4 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रवीवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. रात्री 8च्या सुमारास गस्तीपथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या चकमकीत एका दहशतवाद्यासह चार जणांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मृत पावलेले अन्य तिघे जण दहशतवाद्यांना मदत करणारे होते असे लष्कराचे […]

भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर,4 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

रवीवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. रात्री 8च्या सुमारास गस्तीपथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

या चकमकीत एका दहशतवाद्यासह चार जणांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मृत पावलेले अन्य तिघे जण दहशतवाद्यांना मदत करणारे होते असे लष्कराचे म्हणणे आहे. तर गावकऱ्यांनी मात्र ते स्थानिक नागरिक असल्याचं म्हटले आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद अहमद असे असून तो शोपियानमधील जामनगरी येथील आहे. त्याला ठार करण्यात आल्यानंतर घटनास्थळावरून शस्त्रही जप्त करण्यात आलंय. अशी माहिती भारतीय लष्कराचे श्रीनगरमधील जनसंपर्क अधिकारी राजेश कालिया यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिली आहे.

सुहेल खलिल वागे, मोहम्मद शाहिद खान आणि शाहनवाज अहमद वागे अशी अन्य तीन मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number