जम्मू – चंदनवाडी येथे दरीत बस कोसळली

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३९ जवानांना घेऊन जाणारी सिव्हिल बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती नदीच्या काठावर कोसळली आहे. ही बस सैनिकांना चंदनवाडी येथून पहलगामच्या दिशेने घेऊन जात होती. या बसमध्ये आयटीबीपीचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन २ प्रवास करत होते. दरम्यान या अपघातात ७ जवान शहीद झाले असून […]

जम्मू – चंदनवाडी येथे दरीत बस कोसळली

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३९ जवानांना घेऊन जाणारी सिव्हिल बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती नदीच्या काठावर कोसळली आहे. ही बस सैनिकांना चंदनवाडी येथून पहलगामच्या दिशेने घेऊन जात होती. या बसमध्ये आयटीबीपीचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन २ प्रवास करत होते. दरम्यान या अपघातात ७ जवान शहीद झाले असून इतर जवान गंभीर जखमी झाले आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी पहलगाम आणि अनंतनाग येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. तर गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगर येथे नेण्यात येत आहे.

घातपाताचा तपास सुरू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते पहलगामपासून १६ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू मानले जाते. अपघातात बळी पडलेले हे जवान अमरनाथ यात्रेची ड्युटी संपवून परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सैनिकांनी भरलेली बस पलटी होऊन थेट दरीत कोसळली. अनेक फूट खोल दरीत कोसळल्याने बसचा स्फोट झाला. मात्र त्यामागे काही घातपात आहे का? याचाही तपास गुप्तचर विभाग करत आहे.

अपघातादरम्यान बस घसरून अनेक फूट खोल दरीत कोसळली. इथून सैनिकांना रेस्क्यू करताना खूप अडचणींचा समना करावा लागला. हेलिकॉप्टरचाही वापर करावा लागला. बचावकार्यासाठी गेलेली टीम नदीतही शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. बस पलटी झाल्यानं जवानांना प्रवाहाचा देखील तडाखा बसला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या नदीतून कोणत्याही जवानाचे संकेत मिळालेले नाहीत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number