बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा- गावकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जलयुक्त शिवार अभियानातून सोलापूर तालुक्यात सुरू असलेले बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.   स्वतःच्या खिशाला झळ सोसून जलयुक्तच्या कामाला ग्रामस्थांनी देणगी दिली. मात्र,कारी गावातील लोकांनी याच देणगीतून नदीच्या, ओढ्याच्या सरळीकरणाचे काम केले.   मात्र, ठेकेदरांनी अधिकाऱ्यांच्या […]

बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा- गावकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जलयुक्त शिवार अभियानातून सोलापूर तालुक्यात सुरू असलेले बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट होत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

 

स्वतःच्या खिशाला झळ सोसून जलयुक्तच्या कामाला ग्रामस्थांनी देणगी दिली. मात्र,कारी गावातील लोकांनी याच देणगीतून नदीच्या, ओढ्याच्या सरळीकरणाचे काम केले.

 

मात्र, ठेकेदरांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट काम केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला. सर्व 12 बंधाऱ्यावर अशाच प्रकारच काम चालू आहे.

 

अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देऊनही त्यांच्याकडून या तक्रारीकडे दुर्लक्षित केल जात आहे. संबंधित विभागाने जर कारवाई केली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number