Jalna Accident: जालन्यात संतापजनक घटना! दुचाकीस्वाराला वाचवताना क्रेटा थेट विहिरीत; अडीच तास मदत नाही, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

जालन्यात दुचाकीस्वाराला वाचवताना क्रेटा विहिरीत कोसळली. कारमधील महिलेचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी झाले.

Jalna Accident: जालन्यात संतापजनक घटना! दुचाकीस्वाराला वाचवताना क्रेटा थेट विहिरीत; अडीच तास मदत नाही, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध-पद्मावती मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने क्रेटा रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मदत मिळण्यास झालेल्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारध-पद्मावती मार्गावरून क्रेटा कार जात असताना एका भरधाव दुचाकीस्वाराने कारला धडक दिली. धडकेनंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळावरून निघून गेला. दरम्यान, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन कोसळले.

हेही वाचा: Best Bus Accident: मुलुंड चेकनाका येथे भीषण अपघात; बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कार विहिरीत कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. तर एक महिला कारमध्येच अडकून पडली होती. रात्रीची वेळ आणि अंधारामुळे बचावकार्य करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या.

स्थानिकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने मदतकार्य सुरू ठेवले. मात्र कारमध्ये अडकलेल्या महिलेला वेळेत बाहेर काढण्यात यश न आल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Borivali Crime News : मध्यरात्री तरुणांचा धिंगाणा! रस्ता अडवला, गाडीच्या बोनेटवर केक कापला, हवेत गोळीबारही केला; 10 जणांना अटक, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अपघातानंतर तब्बल अडीच ते तीन तास उलटूनही रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वेळेत आवश्यक मदत मिळाली असती, तर बचावकार्य अधिक वेगाने करता आले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आपत्कालीन यंत्रणा उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number