जळगावात रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना

जळगाव रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना घडली आहे.

जळगावात रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना

जळगाव : जळगाव रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना घडली आहे. जीव वाचावायला गेलेल्या प्रवाशांचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. जळगावात पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

जळगावात रेल्वे प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्या. दरम्यान रुळावर बंगळुरूहून येणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले. रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात धस यांचा मोठा खळबळजनक दावा
 

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात रेल्वे रुळावर अपघात झाल्याची माहिती आहे. जळगावच्या परांडा स्थानकाजवळील घटना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी जळगाव रेल्वे रुळावरील अपघाताची दखल घेतली आहे. एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number