Jalgaon Crime: कर्जबाजारी आणि दारुड्या नवऱ्याचा सततचा त्रास; वैतागलेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, जळगाव हादरलं

जळगावमध्ये आर्थिक तणाव आणि घरगुती वादातून पत्नीने पतीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Jalgaon Crime: कर्जबाजारी आणि दारुड्या नवऱ्याचा सततचा त्रास; वैतागलेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, जळगाव हादरलं

जळगाव शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वाद, आर्थिक तणाव आणि पतीच्या व्यसनाधीनतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पत्नीनेच पतीचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरातील केसी पार्क भागात ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. भरत पाटील असे मृत पतीचे नाव असून, मनीषा पाटील ही त्यांची पत्नी या प्रकरणात संशयित आरोपी आहे. प्राथमिक तपासानुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत पाटील हे दारूच्या आहारी गेले होते तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. कर्जाचा डोंगर वाढल्याने ते कोणतेही काम करत नव्हते, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पत्नी मनीषा यांच्यावर आली होती. त्या काम करून घर चालवत होत्या, मात्र घरात सतत होणारे वाद, शिवीगाळ आणि मारहाणीमुळे त्या मानसिक तणावात होत्या. या सततच्या त्रासाला कंटाळून मनीषा पाटील यांनी संतापाच्या भरात दोरीने गळा आवळून पतीचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करत मनीषा पाटील यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number