शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; विद्यार्थीनीचा केला लैंगिक छळ

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव गुरु साक्षात परंब्रम्ह म्हणजेच गुरुला देवाच्या ठिकाणी स्थान दिलं जातं. मात्र, जळगावच्या एका नराधमानं गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासलीय. जळगावच्या कळमसरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत या नराधमाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जगदीश पाटील असे या नराधम शिक्षकाचं नाव आहे. जगदीश पाटील याने विद्यार्थीनीला दम देऊन तिचा […]

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; विद्यार्थीनीचा केला लैंगिक छळ

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

गुरु साक्षात परंब्रम्ह म्हणजेच गुरुला देवाच्या ठिकाणी स्थान दिलं जातं. मात्र, जळगावच्या एका नराधमानं गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासलीय. जळगावच्या कळमसरे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत या नराधमाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जगदीश पाटील असे या नराधम शिक्षकाचं नाव आहे. जगदीश पाटील याने विद्यार्थीनीला दम देऊन तिचा लैंगिक छळ केला. मात्र, या विद्यार्थीनीनं घडल्या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली.

यासंदर्भात पीडित विद्यार्थीनिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि चौकशी केल्यानंतर अशा प्रकारचे अत्याचार त्याने शाळेतील इतर विद्यार्थीनींवर देखील केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. या संपुर्ण प्रकरणाचा संशय येताच जगदीश पाटील याने तिथून पळ  काढला आहे. दरम्यान अमळनेर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत असून या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number