जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव
जळगाव शहरासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे शंभरहून अधिक मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस जळगाव पोलिसांनी अटक केलीय. जळगाव जिल्ह्यांत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
त्यामुळे जळगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत अमोल बेल्लापा या आरोपीला अटक केलीय. त्याने जळगाव जिल्ह्यांसह राज्यांतील इतर जिल्ह्यातून शंभरहून अधिक मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले.
आरोपी अमोल बेल्लप्पा हा गेल्या बऱ्याच वर्षांपासून मोटारसायकल चोरी गुन्ह्यात सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.