Cyber Crime : देशभरातील नागरिकांच्या ऑनलाइन फसवणुकीचे ‘मनी म्यूले’ रॅकेट उघड; ‘मनी ट्रेल’च्या तपासातून जळगाव सायबर पोलिसांची कारवाई

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत जळगाव सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीतील 'मनी म्यूले' रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट, पार्ट-टाईम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध सायबर गुन्ह्यांतून देशभरातील नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रक्कम भुसावळ येथील एका बँक खात्यात वळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भुसावळ येथील मयूर सुनील […]

Cyber Crime : देशभरातील नागरिकांच्या ऑनलाइन फसवणुकीचे ‘मनी म्यूले’ रॅकेट उघड; ‘मनी ट्रेल’च्या तपासातून जळगाव सायबर पोलिसांची कारवाई

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत जळगाव सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीतील 'मनी म्यूले' रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट, पार्ट-टाईम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध सायबर गुन्ह्यांतून देशभरातील नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रक्कम भुसावळ येथील एका बँक खात्यात वळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भुसावळ येथील मयूर सुनील कोळी याच्या खात्यावर तब्बल 1 कोटी 30 लाख 88 हजार 190 रुपये जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, मयूर कोळी याने सायबर गुन्हेगारांच्या टोळीशी संगनमत करून 408 खात्यांच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारल्याचा पोलिसांना संशय आहे. 'मनी ट्रेल'च्या तपासातून या व्यवहारांचा माग काढण्यात आला असून, मयूर कोळीविरुद्ध महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील 23 ऑनलाइन तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जळगाव सायबर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले असून या तपासातून आणखी मोठे सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती जळगाव सायबर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली आहे. 

हेही वाचा : Kalyan Crime : प्रियकराची हत्या करून प्रेयसी फरार, मृतदेह कुजावा म्हणून नळ सुरू; पण 'त्या' एका व्हाईस मेलने प्लॅन फसला

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number