राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन

  अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं नवी दिल्लीत निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली […]

राष्ट्रसंत जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं निधन

 

अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे जैन मुनी तरुण सागर यांचं दीर्घ आजारानं नवी दिल्लीत निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते.

अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजता त्यांचं निधन झालं.

तरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील.

गेल्या २० दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं…

  • मुनी तरुण सागर यांचं नाव पवन कुमार जैन 
  • त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला.
  • त्यांच्या आईचं नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र 
  • मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्यागले…
  • त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.
  • तरुण सागर यांचं मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेत प्रवचन 
  • हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.
  • मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number