जैन मंदीरावर 5 मेपर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत जैन मंदिर पाडले. मात्र आता जैन मंदीरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत.

जैन मंदीरावर 5 मेपर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई: विलेपार्ले पूर्व परिसरात असलेले 30 वर्षे जुने आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाणाऱ्या जैन मंदिरावर 16 एप्रिल रोजी तोडक कारवाई करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत पाडले.मात्र आता जैन मंदीरावर 5 मे पर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश देण्यात आले आहेत. विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर 5 मे पर्यंत कारवाई करू नये असे आदेश हायकोर्टाने पालिका प्रशासनाला दिले. पालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

नेमकं काय घडलं?
विलेपार्ले पूर्व परिसरात असलेले 30 वर्षे जुने आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाणाऱ्या जैन मंदिरावर  बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई अंतर्गत पाडले. या कारवाईनंतर जैन समाजात तीव्र नाराजी पसरली. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाच्या या कृतीचा जोरदार निषेध केला. 

हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून विलेपार्ले परिसरात कार्यरत होते. स्थानिकांच्या मते, या मंदिरात दररोज अनेक जैन भाविक दर्शनासाठी येत असत आणि अनेक धार्मिक विधी या ठिकाणी पार पडत असत. मंदिर परिसरात सण, उपवास आणि प्रवचनांच्या कार्यक्रमांनाही मोठी उपस्थिती असायची.

पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सदर मंदिर सार्वजनिक रस्त्याच्या सीमारेषेत अतिक्रमण करून बांधण्यात आले होते. यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई किंवा स्थलांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. त्यामुळे नियमांचे पालन करत मंदिरावर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number