राष्ट्रवादीने शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मात्र, तसे करताना राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख झाल्याने वाद जन्मला आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सोमवारी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना चक्क ‘एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकायला हवं’, असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे, राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
विद्या चव्हाण म्हणतात, “मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जातात. पण, त्यांना राज्यातील देवी, देवता दिसत नाहीत. कारण कामाख्याच्या ठिकाणी जादूटोणा चालतो. मुख्यमंत्रीच जादूटोणा करत असतील तर त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. यापुढे, भोंदूगिरी करणारे भगवी वस्त्र कशी धारण करतात? असा सवाल करत मुख्यमंत्री भोंदूगिरी करतात. यामुळे त्यांचे महागाईकडे लक्ष नाही असे म्हटले आहे.”, असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला आहे.
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.