‘जे.जे. रुग्णालया सोबतचा संबंध संपला’

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वादाला आज आणखी एक वळण लागले आहे. या विभागाच्या डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला असल्याचे विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी उद्विग्नपणे जाहीर केले. नेत्रशल्यचिकित्सा विभागातील ८ प्राध्यापक डॉक्टरांनी पत्रकार परिषदेला हजेरी […]

‘जे.जे. रुग्णालया सोबतचा संबंध संपला’

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील वादाला आज आणखी एक वळण लागले आहे. या विभागाच्या डॉक्टरांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला असल्याचे विभागाचे मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांनी उद्विग्नपणे जाहीर केले. नेत्रशल्यचिकित्सा विभागातील ८ प्राध्यापक डॉक्टरांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमची चौकशी करा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप डॉ. लहाने यांनी केला.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आमची बाजू न ऐकता चौकशी पूर्ण केली आणि आम्हाला दोषी ठरवले. 6 महिन्यांपूर्वी काही निवासी डॉक्टर रुजू झाले, रुग्ण तपासणे आणि त्यांचा इतिहास लिहिणे हा अभ्यासक्रमाचा भाग आहे. निवासी डॉक्टरांना स्टायपंड म्हणून काम करण्यासाठी दिले जाते. विद्यार्थ्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया शिकविल्या आहेत, ते समाधानी असल्याचे निवासी डॉक्टरांनी लिहून दिले आहे. लेक्चर किती झाले, नोट्स दिल्या याच्या नोंदी आहेत. दोन जागा रिक्त आहेत, या जागा भराव्यात याबाबत आम्ही पत्र लिहीले आहे, अशी माहिती यावेळी डॉ. लहाने यांच्याकडून देण्यात आली.

तर, जे. जे. रुग्णालय केवळ शिकवण्यासाठी नाही तर सेवेसाठी आहे, लांबून खेडेगावातून येणाऱ्या रुग्णाला सेवा देणे गरजेचे आहे. आमचे राजीनामे 31 तारखेला व्यवस्थित फॉरमॅटमध्ये दिले आहे. आता राहिलेली प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करणार आहे. आरोपांमुळे आम्ही उद्विग्न झालो असल्याने हे राजीनामे दिले असल्याचे यावेळी डॉ. लहाने यांच्याकडून सांगण्यात आले. मी मुंबईत ३० आणि आंबेजोगाई इथे ६० पिढ्या घडवल्या आहेत. एवढे शिकवल्यावर असे कोणी बोलत असेल तर यामुळे मी उद्विग्न झालो आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. लहाने यांनी व्यक्त केली.

आमची बदनामी केली, पण गरीब रुग्ण येतात त्याला सेवेची गरज आहे. त्यांना आंधळे होताना पाहण्यापेक्षा आम्ही बाजूला होतो. आम्हाला जे. जे. रुग्णालयात जायचे नाही. या डॉक्टर प्राध्यापकांवर दबाव आहे. हा अपमान सहन करण्यापलीकडे आहे. मी विक्रमासाठी नाही तर सेवा म्हणून शस्त्रक्रिया करत आहे. आम्ही निवासी डॉक्टरांना दोषी ठरवणार नाही. विद्यार्थ्यांना काही शिकायचे असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे पण आम्ही तिकडे जाणार नाही. चांगले शिक्षक आणून त्यांना शिकवावे. पण आता जे. जे. रुग्णालय आणि आमचा संबंध संपला आहे. माझा आणि मंत्र्यांचा काहीही वाद नाही. यामागे राजकरण आहे की नाही हे मला माहीत नाही, असेही यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून सांगण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number