एकेकाळी गाजवलेला लावणीचा फड, आता भीक मागण्याची आली वेळ

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : ‘नटसम्राट’ या अजरामर नाट्यकृतीतील गणपत बेलवलकरांची शेवटची अवस्था वाचली की आपसूक डोळे पाणावतात. आधी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले बेलवलकर शेवटी वण वण फिरताना दिसतात. या नाट्यकृतीने खऱ्या अर्थाने आजच्या समाजाचे प्रतिबिंब दाखवले. याचं कारण म्हणजे एकेकाळी रंगभूमी गाजवलेल्या अनेक कलाकारांची आजच्या घडीला वाईट अवस्था झाली आहे.याच जिवंत उदाहरण म्हणजेआज […]

एकेकाळी गाजवलेला लावणीचा फड, आता भीक मागण्याची आली वेळ

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : ‘नटसम्राट’ या अजरामर नाट्यकृतीतील गणपत बेलवलकरांची शेवटची अवस्था वाचली की आपसूक डोळे पाणावतात. आधी नट म्हणून रंगभूमी गाजवलेले बेलवलकर शेवटी वण वण फिरताना दिसतात. या नाट्यकृतीने खऱ्या अर्थाने आजच्या समाजाचे प्रतिबिंब दाखवले. याचं कारण म्हणजे एकेकाळी रंगभूमी गाजवलेल्या अनेक कलाकारांची आजच्या घडीला वाईट अवस्था झाली आहे.याच जिवंत उदाहरण म्हणजेआज विस्मरणात गेलेलं पण एकेकाळी तमाशाच्या फड गाजवलेले एक नाव, ते नाव म्हणजे ‘शांताबाई कोपरगावकर’.

एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रेक्षक भरमसाठ गर्दी करुन उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर दुसरीकडे अनेक लोककलावंत काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्याने हलाखीचे जीवन जगात आहेत. अशाच एका लावणीच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून टाकल होत. आज या लावणी सम्राज्ञीवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं त्यांचं नाव.

काही दिवसांपूर्वी शांताबाईची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची भिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडीओ बनवून समाज माध्यमांवर टाकला. बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. खान्देश भागातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडीओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. त्यानंतर खरात यांनी शांताबाईंचा खूप शोध घेतला. अखेर त्यांची ओळख पटली. त्यामुळे सध्या शांताबाईंना राज्य सरकारने वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number