बायकोनेच दिली नवऱ्याच्या खूनाची सुपारी.

  खंडेरायाच्या जेजुरीत एक अत्यंत वाईट घटना घडलीये, एका महिलेन स्वतः च्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण पोलिसांनी दोन तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणामुळे जेजुरीत एकच खळबळ उडाली आहे. पुजा हरीशचंद्र थोपटे असे मृताच्या पत्नीचे नाव आहे. तिचे […]

बायकोनेच दिली नवऱ्याच्या खूनाची सुपारी.

 

खंडेरायाच्या जेजुरीत एक अत्यंत वाईट घटना घडलीये, एका महिलेन स्वतः च्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण पोलिसांनी दोन तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणामुळे जेजुरीत एकच खळबळ उडाली आहे.

पुजा हरीशचंद्र थोपटे असे मृताच्या पत्नीचे नाव आहे. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिने पतीचा खूनाची सुपारी देऊन आपलयच पतीची हत्या केल्याची माहिती आहे. प्रणव राजेंद्र ढावरे यास सुपारी देण्यात अली होती. शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र बजरंग थोपटे (वय 42 वर्षे ) यांचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. खून करून संबंधितांणी मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकलेला होता, मृताच्या चेहेऱ्यावर धारदार शास्त्राने वार करण्यात आलेले होते. मृत देहाची ओळख पटू नये म्हणून चेहेऱ्यावर वार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी ८ ते ९ आरोपीना ताब्यात घेतले आहे. धीरज उर्फ बंटी संजय चावरे (वय 24 वर्षे), निकेश विरेंद्र सिंह ठाकुर ( वय 20 वर्षे ) सिध्दात संभाजी भोसले (वय 25 वर्षे), विशाल रूपचंद चव्हाण ( वय 20 वर्षे) आणि शुभ चिन मयारे (वय 19 वर्षे) सुरेश कांतीलाल कडाळे (वय 25 वर्षे) पान लखन बाळाजी सूर्यवंशी (वय 24 वर्षे), स्वरूप रामदास जाधव (वय 21 वर्षे), अशी इतर अटक आरोपींची नावे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number