भिडे गुरुजींविरोधात पोलीस नोटीस काढणं चूक- शिवप्रतिष्ठान

‘भीमा कोरेगाव प्रकरणी गुरुजींना क्लीनचिट मिळाली असतानासुद्धा जर पोलीस नोटीस काढत असतील, तर ते अत्यंत चुकीचं आहे.’ असं विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केलं आहे. ‘आजपर्यंत आम्हाला कुठली नोटीस आम्हाला मिळालेली नाही. तिथले पोलीस अधिकारी अशी नोटीस काढणार नाही अशी आमची खात्री आहे. पुणे जिल्ह्यात भिडे गुरुजींचा नियोजित दौरा नाही. त्यामुळे नोटीस काढली […]

भिडे गुरुजींविरोधात पोलीस नोटीस काढणं चूक- शिवप्रतिष्ठान

‘भीमा कोरेगाव प्रकरणी गुरुजींना क्लीनचिट मिळाली असतानासुद्धा जर पोलीस नोटीस काढत असतील, तर ते अत्यंत चुकीचं आहे.’ असं विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केलं आहे. ‘आजपर्यंत आम्हाला कुठली नोटीस आम्हाला मिळालेली नाही. तिथले पोलीस अधिकारी अशी नोटीस काढणार नाही अशी आमची खात्री आहे. पुणे जिल्ह्यात भिडे गुरुजींचा नियोजित दौरा नाही. त्यामुळे नोटीस काढली म्हणून तो दौरा रद्द होईल असंही नाही’ असं विधान चौगुले यांनी केलंय.

शिवप्रतिष्ठानची गडकोट मोहीम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात असते. ती 8 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यासाठी नियोजित दौरे ठरले आहेत. या नियोजनात ‘पुणे ग्रामीण’ असेल तर 100% गुरुजी त्या ठिकाणी जाऊन सभा घेतील, असं नितीन चौगुले यांनी सांगितलं.

 कोरेगाव भीमा ही महाराष्ट्राला कलंक असलेली घटना आणि दुर्दैवी घटना घडल्यापासून आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे.

अनेक वेळा चौकशी झाली, मात्र यातून काही निष्पन्न झालेलं नाही.  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भिडे गुरुजींना क्लीनचिट दिली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी ज्या लोकांनी गुरुजींवर आरोप केलेत, त्या लोकांनी चौकशी आयोगासमोर मात्र याची तक्रार केलेली नाही.

गुरुजींच्या विरोधात फिर्याद करणाऱ्या अनिता साळवे यांनी न्यायालयामध्ये मात्र गुरुजींची उपस्थिती ही अफवा असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पोलीस जर आता गुरुजींना नोटीस देत असतील तर ते चुकीचं आहे, असं शिवप्रतिष्ठानच्या वतीने साताऱ्यात स्पष्ट करण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number