हयात नसलेल्यांबद्दल अशी भाषा अयोग्य – शरद पवार

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत असून त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर घणाघाती टीका केली होती. नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना उत्तर दिले आहे. जी व्यक्ती हयात नाही, ज्यांची हत्या झाली त्या व्यक्ती संदर्भात अशी भाषा करणे योग्य नाही असे […]

हयात नसलेल्यांबद्दल अशी भाषा अयोग्य – शरद पवार

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत असून त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर घणाघाती टीका केली होती. नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना उत्तर दिले आहे. जी व्यक्ती हयात नाही, ज्यांची हत्या झाली त्या व्यक्ती संदर्भात अशी भाषा करणे योग्य नाही असे मत शरद पवारांनी मांडले आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

साताऱ्यात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६०वी पुण्यतिथीच्या निमित्ताने शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलाताना शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल मत मांडले.

जी व्यक्ती हयात नाही, ज्यांची हत्या झाली त्या व्यक्ती संदर्भात अशी भाषा करणे योग्य नाही असे मत शरद पवारांनी मांडले आहे.

तसेच शरद पवारांनी अनेक गोष्टींबद्दल भाष्य केले.

सरकराने दुष्काळावर लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

दिल्ली येथील रामलीला मैदानावर आोयजित केलेल्या सभेत कॉंग्रेसवर घणाघात केला.

राजीव गांधी पंतप्रधान असताना कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी विराट युद्धनौकेचा वापर केला असा गंभीर आरोप मोदींनी लावला आहे.

आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर व्यक्तिगत टॅक्सीसारखा केला असल्याचे म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी सुद्धा राजीव गांधींविरोधात हल्लाबोल चढवला होता.

तुमचे वडिल राजीव गांधी मिस्टर यांची ओळख मिस्टर क्लिन म्हणून होती.

मात्र  मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

तसेच त्यांच्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली होती.

राजकीय नेत्यांसह अनेक नागरिकही संतप्त झाले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number