सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या या पार्श्वभूमीवर राज्यसरकाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. गेली दोन वर्ष कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात […]

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या या पार्श्वभूमीवर राज्यसरकाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

गेली दोन वर्ष कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. मात्र, त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, पुणे आणि रायगड या शहरांमध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे, बस, सिनेमागृह, रुग्णालय, महाविद्यालये याठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

देशात महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली असून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार आज नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवहन केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येत घट झाली नाही तर कठोर निर्णय लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number