शिवेंद्रराजे सोडून गेल्यामुळे काही फरक पडणार नाही – शरद पवार

सध्या भाजपात मेगाभरती सुरू असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपात इनकमिंग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच मी राष्ट्रवादी सोडून जाणार नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले होते. त्यामुळे ते सत्य सोडून सर्व काही […]

शिवेंद्रराजे सोडून गेल्यामुळे काही फरक पडणार नाही – शरद पवार

सध्या भाजपात मेगाभरती सुरू असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. भाजपात इनकमिंग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच मी राष्ट्रवादी सोडून जाणार नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी सांगितले होते. त्यामुळे ते सत्य सोडून सर्व काही बोलतात अशी घणाघात टीका केली.

भाजपा इनकमिंगवर घणाघात –

बुधवारी कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे 4 आमदारांनी भाजपात प्रवेश केला.

पिचड, वाघ, नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर घणाघात केला आहे.

शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही.

शिवेंद्रराजे पुण्यात भेटले असताना मी भाजपात प्रवेश करत नसल्याचे म्हटले होते.

त्यामुळे सत्य सोडून सर्व काही बोलतात असे पवारांनी म्हटलं आहे.

साताऱ्याची जागा राष्ट्रवादीचीच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तिहेरी तलाकच्या शिक्षेला आमचा विरोध –

तिहेरी तलाक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम भगिनींना संरक्षण मिळण्याबाबत आमचा पाठिंबा आहे.

मात्र कायद्यात तीन वर्षांच्या शिक्षेचा कालावधी जास्त असल्याने आम्ही विरोध करत होतो.

पतीवर केस असल्यामुळे चित्रा वाघ भाजपात –

चित्रा वाघ यांच्या संस्थेच्या दोन फाईल्स अॅन्टीकरप्शनकडे पाठवल्यामुळे पतीवर केस सुरू झाली आहे.

केसमुळे तोंड देणं अवघड झाल्याचे चित्रा वाघ यांनी मला डोळ्यात पाणी आणून सांगितले असे शरद पवार म्हणाले.

त्यामुळे चित्रा वाघ यांनी भाजपाता प्रवेश केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number