भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने १२ ऑगस्टला सकाळी ५.४३ वाजता अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइटचे जीएसएलव्ही- एफ १० रॉकेटच्या सहाय्याने यशस्वी लॉन्चिंग केले. मात्र, मिशनमध्ये वेळेच्या १० सेकेंद आधीच गडबड झाली. मिशन कंट्रोल सेंटरला रॉकेटच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या क्रायोजेनिक इंजिनकडून १८ मिनिटं २९ सेकंदाला सिग्नल आणि आकडे मिळणे बंद झाले होते. यामुळे मिशन कंट्रोल सेंटरमधील वैज्ञानिक अस्वस्थ झाल्याचेही दिसून आले. वैज्ञानिक काही वेळ आकडे मिळण्याची आणि अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत होते. यानंतर मिशनचे डायरेक्टर यांनी इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांना ही माहिती दिली आणि इस्रो प्रमुखांनी, क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही तांत्रिक दोष आढळला आहे. यामुळे हे मिशन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही .
रॉकेट जीएसएलव्ही- एफ १० हे जीएसएलव्ही- एमके २ या प्रकारातील होते. २५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह भुस्थिर कक्षेत नेण्याची क्षमता असलेले, क्रायजेनिक इंजिनाचा समावेश असलेले जीएसएलव्ही- एमके २ हे एक इस्रोचे महत्त्वाचे प्रक्षेपक – रॉकेट आहे. जीएसएलव्ही- एमके २ चे एकूण १४ वे उड्डाण होते. २००१ पासून सुरू झालेल्या जीएसएलव्ही- एमके २ च्या प्रक्षेपणात सुरुवातीला एकूण पाच मोहिमांमध्ये अपयशाचा सामना इस्रोला करावा लागला होता. मागील काही काळामधील हा इस्त्रोचा तिसरा प्रयत्न अपयशी ठरला आहे . यापूर्वी ५ मार्च २०२० रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र प्रक्षेपणाच्या २६ तास आधीच ते रद्द करण्यात आले . त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला या उपग्रहाचे प्रक्षेपण अपेक्षित होते पण व्होल्टेजसंदर्भातील अडचणीमुळे हा प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले . इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी त्यावेळी छोट्या अडचणीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलत असल्याचं म्हंटले.