Israel Attack On Pakistan Embassy: युद्धाचा भडका! इस्रायलचा तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासावर हवाई हल्ला, नेतन्याहू यांची चूक की रणनीती ?

तेहरानमध्ये गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून मिसाइल हल्ले केले जात आहेत.

Israel Attack On Pakistan Embassy: युद्धाचा भडका! इस्रायलचा तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासावर हवाई हल्ला, नेतन्याहू यांची चूक की रणनीती ?

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. तेहरानमध्ये पाकिस्तानी दूतावास आणि तेथील राजदूतांच्या निवासस्थानाजवळ इस्रायलने हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटांचे आवाज दूतावास परिसरापर्यंत ऐकू आल्याने तेथील राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी काही काळ घाबरून गेले होते. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

तेहरानमधील पाकिस्तानी दूतावास हा पाकिस्तानच्या सार्वभौम क्षेत्राचा भाग मानला जातो. त्यामुळे या परिसराच्या अगदी जवळ झालेला हल्ला पाकिस्तानसाठी अत्यंत गंभीर मानला जात आहे. घटनेनंतर दूतावासातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. राजनैतिक अधिकाऱ्यांनी तातडीने सुरक्षा व्यवस्था तपासून सर्व काही नियंत्रणात असल्याची खात्री केली.

या घटनेची वेळ विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण पाकिस्तान, तुर्कीआणि इजिप्त हे तीन देश मिळून अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘शटल डिप्लोमसी’च्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून, पाकिस्तानने चर्चेचे आयोजन करण्याची तयारीही दर्शवली आहे.

हेही वाचा: Sangli Crime : सांगली हादरली! निर्दयी बापाने पोटच्या लेकींचा केला अमानुष छळ, रात्रभर पत्र्याला उलटं टांगलं आणि….; एकीचा दुर्दैवी अंत

दरम्यान, या हल्ल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेतला जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा हल्ला चुकून झाला असण्याची शक्यता आहे, तर काहींच्या मते पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठीही हा हल्ला असू शकतो.

तेहरानमध्ये गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून मिसाइल हल्ले केले जात आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने यापूर्वीही इराणवरील हल्ल्यांचा निषेध करत शांततेचे आवाहन केले होते. सध्याच्या परिस्थितीत दूतावासातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही घटना दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील संबंधांवर दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते. पाकिस्तान एकीकडे इराणशी मैत्रीपूर्ण संबंध राखत असताना, दुसरीकडे अमेरिकेसोबत संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या हल्ल्याचा शांतता प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Operation Sindoor Movie: मोठी घोषणा! पहलगाममधील दहशतवादी हल्ला अन् भारताचं चोख प्रत्युत्तर, 'ऑपरेशन सिंदूर' लवकरच मोठ्या पडद्यावर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number