गुजरातमधुन आयसिसशी संबंधित 2 संशयित दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था, सूरत सुरतमधून आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे.  गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी घातपात घडवण्याचा कट हे दोघे रचत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे एटीएसने सांगितलंय. आयसिस या दहशतवादी संघटनेला गुजरात निवडणुकांच्या वेळी हल्ला करायचा होता किंवा घातपात घडवायचा होता, अशीही […]

गुजरातमधुन आयसिसशी संबंधित 2 संशयित दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था, सूरत

सुरतमधून आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे.  गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी घातपात घडवण्याचा कट हे दोघे रचत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे एटीएसने सांगितलंय. आयसिस या दहशतवादी संघटनेला गुजरात निवडणुकांच्या वेळी हल्ला करायचा होता किंवा घातपात घडवायचा होता, अशीही माहिती एटीएसने दिलीय.

या संदर्भात या दोन संशयितांची चौकशी करण्यात येते आहे असेही एटीएसने स्पष्ट केले. बुधवारी दुपारी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आल्या आहेत. त्यावेळी घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number