‘यशोमती ठाकूर शुक्रवारच्या दंगलीवर गप्प का?’ – देवेंद्र फडणवीस

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर त्याचे पडसाद म्हणून अमरावती शहरात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड तसेच व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत दाखल झाले आहेत.   अमरावतीमधील रझा अकादमीचा मोर्चा चुकीच्या […]

‘यशोमती ठाकूर शुक्रवारच्या दंगलीवर गप्प का?’ – देवेंद्र फडणवीस

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर त्याचे पडसाद म्हणून अमरावती शहरात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड तसेच व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत दाखल झाले आहेत.

  अमरावतीमधील रझा अकादमीचा मोर्चा चुकीच्या माहितीवर काढण्यात आला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्यावरही फडणवीसांनी निशाणा साधला आहे. अमरावतीत शुक्रवारी झालेल्या दंगलीवर यशोमती ठाकूर गप्प का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

  अमरावतीमध्ये हिसांचाराल हिंसक वळण लागले असून बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले. ‘त्यामुळे आम्ही मार खाऊ देणार नाही, एकतर्फी कारवाईच्याविरोधात भाजप जेलभरो करेल’, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. अमरावतीमध्ये रझा अकादमीच्या आंदोलनामध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले. अमरावतीमधला रझा अकादमीचा मोर्चा चुकीच्या माहितीवर काढण्यात आला असून अमरावतीमध्ये मोर्चादरम्यान अशांतता पसरवण्यात आली. त्यामुळे या अशांतता माजवण्याचा प्रयत्न तपासायला हवा असेही फडणवीस म्हणाले.

  अमरावतीमध्ये हिंसाचाराला शुक्रवारी हिंसक वळण लागले. शुक्रवारच्या दंगलीवर सत्ताधारी पक्ष चिडीचूप असून शुक्रवारी दंगल घडवून आणणाऱ्या दंगलखोरांवर सत्ताधारी पक्ष कारवाई करत नाही. मात्र शनिवारी झालेल्या क्रियेला प्रतिक्रिया देण्यात आली असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  रझा अकादमीच्या दंगलीनंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर आली असली तरी इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या दंगलीच्या घटनेमुळे लोक अद्यापही भयग्रस्त असल्याचे यावेळी फडणवीस यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number