क्रुझ ड्रग्जप्रकरणी राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकल आहे, असा टोला भाजपवर लगावला. यावर विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला आहे. तसेच कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असेही फडणवीस म्हणाले. मलिकांना दुसरे काम नसून ते दिवसभर काहीही बोलत असतात, त्यामुळे त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले.
नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच भाजपवरही टीकास्त्र सोडले आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील, परंतु मला विषयांतर करायचे नाही. अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होतील, असे नवाब मलिक म्हणाले.