बॉलीवूड अभिनेता इरफान खान भले आपल्या सोबत नसला तरीही तो चाहत्यांच्या मनात घर करुन गेलाय. त्याने नेहमीच वेगळ्या विषयावरील सिनेमांमध्ये आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे.अशातच इरफानच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. इरफानचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सिनेमा ‘द सॉग्न ऑफ स्कॉर्पियन्स’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता इरफान खानचे चित्रपट पहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडायचे. अलीकडेच इरफानचा अखेरचा चित्रपट ‘द सॉग्न ऑफ स्कॉर्पियन्स’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला.त्याचा मुलगा बबली खान याने आपल्या सोशल मीडियावरून याची माहिती दिली. खरतरं या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहून त्याला प्रेक्षक किती पसंद करतात हे पहायला मिळतेय. येत्या २८ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स सिनेमा’ हा २०१७ मध्येच प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु त्यावेळी तो सिनेमा स्विस ,फ्रेंच ,सिंगापोरिअन आणि राजस्थानी भाषेत तयार करण्यात आला होता. परंतु आता तो हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.यात इरफान सोबत गोशिफतेह फराहानी, वहीदा रहमान आणि शशांक अरोरा हे कलाकार देखील आहेत.