कल्याण पूर्वेतील नागरिकांसोबत थट्टाच सुरू आहे. महापालिकेच्या हरिकिसन दास रुग्णालयात सकाळी साडे नऊ ते साडे अकरा 2 तास काम चालते.
इतर वेळेस रुग्णालयातील कर्मचारी चांगलीच ताणून देत आहेत. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ १७ फेब्रुवारीपासून व्हायरल होतोय.
या रुग्णालयात दररोज रुग्णांवर सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान उपचार केले जातात. ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) 11.30 वाजता बंद होते.

जेमतेम 12.30 पर्यंत काम केल्यानंतर रुग्णालयामध्ये कर्मचारी ताणून झोप घेतानाचा व्हिडीओ वायरल झालाय.
पहिल्या दिवशी तपासणी केली असता, दुसऱ्या दिवशीही रुग्णांना सकाळी 11.30 च्या आधी या, असं सांगितलं जातं. या संदर्भात येथे एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे.
त्यामुळे अवघे 2 तास ओपीडी सुरु असल्याने सामन्यांचे हाल होत आहे. सर्वसामान्य जनता या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येते.
परंतु रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक जनतेची गैरसोय होत आहे.
त्यामुळे या प्रकरणात संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सामन्यांकडून मागणी केली जात आहे.