इरफानच्या प्रकृतीबाबत पत्नीचं चाहते आणि मित्र परिवाराला शांततेचं आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला एका आजाराने त्रस्त केल आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता त्यांची पत्नी सुतपाने प्रेम आणि सदिच्छांबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘माझा बेस्ट फ्रेण्ड आणि जोडीदार हा लढवय्या आहे अस त्यांनी यावेळी म्हटलं. तो प्रत्येक अडथळ्याला सामोरा जात […]

इरफानच्या प्रकृतीबाबत पत्नीचं चाहते आणि मित्र परिवाराला शांततेचं आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानला एका आजाराने त्रस्त केल आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर आता त्यांची पत्नी सुतपाने प्रेम आणि सदिच्छांबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

‘माझा बेस्ट फ्रेण्ड आणि जोडीदार हा लढवय्या आहे अस त्यांनी यावेळी म्हटलं. तो प्रत्येक अडथळ्याला सामोरा जात आहे. तुमचे फोन आणि मेसेजेसना उत्तर न देऊ शकल्याबद्दल क्षमस्व आहे. पण मला तुम्हा सर्वांना आवर्जून सांगायचं आहे, की तुमच्या प्रार्थना आणि काळजीमुळे मी अत्यंत भारावून गेले आहे. ‘

‘रणभूमीत उतरल्यावर संकटांना कशाप्रकारे तोंड द्यायचं, याकडे आता खऱ्या अर्थाने माझं लक्ष गेल आहे. हा लढा सोपा नव्हता, नाही आणि नसेल. मात्र कुटुंबीय, मित्र आणि इरफानच्या चाहत्यांनी जो विश्वास निर्माण केला जो आधार दिला, त्यामुळे मी आशावादी आणि विजयाची निश्चिती वाटते.’

‘आमच्या काळजीतून तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्याचं मी समजून गेली आहे. पण आता आजारावर विचार करण्यापेक्षा प्रार्थना करुया. जीवनगाणं, आयुष्याचा नृत्याविष्कार आणि विजय यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती करते. माझं कुटुंब लवकरच या आनंदात सहभागी होईल. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number