Iran US War Update : अमेरिका आणि इराण युद्धाबाबत मोठी अपडेट, दोन्ही देशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण यांच्यातील भूमिकेत अचानक मोठा बदल पाहायला मिळतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला आहे.

Iran US War Update : अमेरिका आणि इराण युद्धाबाबत मोठी अपडेट, दोन्ही देशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

गेल्या दिड महिन्यापासून सुरु असलेला अमेरिका-इराण यांच्यातील युद्धाने टोकाची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली होती. यामुळे अनेक देशांना या युद्धाची झळ देखील लागत होती. अशातच मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण यांच्यातील भूमिकेत अचानक मोठा बदल पाहायला मिळतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ज्यामुळे राजकीय वाटाघाटींचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराण या दोघांनी युद्धविरामास सहमती दर्शवली असून, इस्रायलनेही हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी लागू राहील, ज्यामुळे राजनैतिक चर्चेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही देशातील पुढील चर्चा पाकिस्तानात होणार आहे. 

हेही वाचा- US Israel-Iran War : इराणचा ट्रम्प यांना ‘आरपार’चा इशारा! 1 कोटी 40 लाख नागरिक बलिदानासाठी सज्ज; होर्मुझ सामुद्रधुनीवरून युद्ध पेटणार?

यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, “पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारावर, आणि त्यांनी मला आज रात्री इराणवर पाठवण्यात येणारी विनाशकारी शक्ती थांबवण्याची विनंती केली आहे, तसेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दिल्यास, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ला आणि हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे. ही दुहेरी बाजूची युद्धबंदी असेल! असे करण्याचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि इराणसोबत दीर्घकालीन शांतता तसेच मध्य-पूर्वेतील शांततेसंदर्भात एका निश्चित कराराच्या दिशेने आम्ही खूप पुढे गेलो आहोत. आम्हाला इराणकडून १०-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटी करण्यासाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पूर्वीच्या वादाच्या जवळपास सर्व विविध मुद्द्यांवर सहमती झाली आहे, परंतु दोन आठवड्यांचा कालावधी कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो अंमलात आणण्यासाठी पुरेसा ठरेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून, आणि मध्य-पूर्वेतील देशांचे प्रतिनिधित्व करत, मी अमेरिकेच्या वतीने हा प्रस्ताव देत आहे.”

हेही वाचा- Donald Trump Warn Iran : ‘आज रात्री संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल’, डोनाल्ड ट्रम्पची इराणला सर्वात मोठी धमकी; 48 तासांच्‍या अल्‍टिमेटमकडे संपूर्ण जगाचे लक्ष

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यांनी त्यांना नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केली होती. हा युद्धविराम घडवून आणण्यात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. दरम्यान पुढील 15 दिवसांत काय होणार? अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा कुठे आणि केव्हा होणार? होर्मुझबाबत काय योजना आहे? याकडे संपूर्ण जगाच लक्ष लागलेलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number