विमान कोसळून 66 प्रवाशांचा मृत्यू

वृत्तसंस्था, इराण इराणमध्ये विमान अपघाताची घटना घडलीय. या अपघातात 66 प्रवाशांचा मृत्यू झालाय. या विमानाचा तेहराण ते यासूज असा प्रवास होता. उड्डाण भरल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत हे विमान रडारमधून गायब झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटांतच विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले. हा अपघात डोंगराळ भागात झाल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे आले. या विमानात 60 प्रवासी आणि 6 […]

विमान कोसळून 66 प्रवाशांचा मृत्यू

वृत्तसंस्था, इराण

इराणमध्ये विमान अपघाताची घटना घडलीय. या अपघातात 66 प्रवाशांचा मृत्यू झालाय. या विमानाचा तेहराण ते यासूज असा प्रवास होता. उड्डाण भरल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत हे विमान रडारमधून गायब झाले. त्यानंतर पुढील काही मिनिटांतच विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले. हा अपघात डोंगराळ भागात झाल्यामुळे बचावकार्यात अनेक अडथळे आले. या विमानात 60 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते.

इराणच्या आपातकालीन सेवा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच बचाव पथक रवाना झाले. पण दूषित हवामानामुळे बचावकार्यात अनेक अडथळे आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विमान तात्काळ लॅंन्डिंगसाठी जागा शोधत असतानाच कोसळले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number