Iran-Israel War End : अखेर इराण-इस्रायल युद्ध संपणार? तारीखही आली समोर पण…

ट्रम्प यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याची शपथ घेतली.

Iran-Israel War End : अखेर इराण-इस्रायल युद्ध संपणार? तारीखही आली समोर पण…

अमेरिकेने इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्याची तारीख जाहीर केली आहे. अमेरिकेने युद्ध समाप्तीसाठी 9 एप्रिल, 2026 ही तारीख निश्चित केली आहे. इराणला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपण्याच्या अगदी आधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने मध्य-पूर्वेत शांततेचे संकेत दिले. ट्रम्प यांनी पुढील पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्याचे ठरवले आहे. 

ट्रम्प यांचा दावा आहे की दोन्ही देशांमधील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असून सुमारे 15 मुद्द्यांवर करार झाले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मते, इराणसोबतच्या चर्चेवरूनच सर्वसमावेशक करार शक्य आहे की नाही हे ठरेल. इराणने सुरुवातीला अमेरिकेसोबत चर्चा होत असल्याचे नाकारले होते, परंतु नंतर वाटाघाटी सुरू असल्याचे मान्य केले.

हेही वाचा – History of Tel Aviv : फक्त 66 कुटुंबांनी वसवलेलं 'तेल अवीव'! आज बनलयं इस्रायलचं आर्थिक केंद्र; अशी आहे समुद्रकिनाऱ्यावरील 'त्या' ऐतिहासिक लिलावाची गोष्ट 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी करार झाल्यास तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरतील. ट्रम्प म्हणाले की, अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा, मोजतबा खामेनी, बेपत्ता असून त्याला काय झाले हे कोणालाही माहीत नाही. त्यांनी असा दावा केला की इराणचे नेतृत्व राहिलेले नाही. 

हेही वाचा – Indian LPG Tanker Ships : भारताचे राजनैतिक यश! होर्मूझच्या संकटातून सुटले दोन LPG टँकर जहाजे; इराणच्या नौदलाने दिले विशेष संरक्षण 

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, "आमच्या चर्चेत पश्चिम आशियातील संघर्ष आणि त्याचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आम्ही विशेषतः ऊर्जा सुरक्षेच्या चिंतेवर चर्चा केली. आम्ही संपर्कात राहण्याचे मान्य केले." इजिप्त आणि तुर्की हे अमेरिका आणि इराण यांच्यात दूतांची भूमिका बजावतात. वाटाघाटींसाठी इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number