जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात बेड्या ठोकल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या हसिना पारकरच्या घरातून अटक करण्यात आली अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.
इक्बाल कासकरने बिल्डरकडून खंडणी म्हणून 4 फ्लॅटची मागणी केली होती. ही टोळी दाऊद चालवत असल्याची शंका आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काही राजकीय व्यक्तींचीही नावं आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
तसंच परमवीर सिंह यांनी दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका व्यक्त केल्यानं, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.