‘ठाणे पालिकेची चौकशी करा’

मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळेस बोलत असताना ‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’ असे म्हणत ‘चौकशी करायची असेल तर ठाणे पालिका, पीएम केअर फंडाची करा’ अशी मागणी उद्धव यांनी केली. ज्या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून ते काय चौकशी करणार, असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

‘ठाणे पालिकेची चौकशी करा’

मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळेस बोलत असताना ‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’ असे म्हणत ‘चौकशी करायची असेल तर ठाणे पालिका, पीएम केअर फंडाची करा’ अशी मागणी उद्धव यांनी केली.

ज्या सरकारचा जन्मच मुळात खोक्यांतून ते काय चौकशी करणार, असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उपस्थित केला आहे. आम्ही चौकशीला घाबरत नाही. चौकशी करायची तर ठाणे मनपाची चौकशी करा. भाजपचे आमदार संजय केळकर यांनीच ही मागणी केली आहे. पण या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच काही किंमत नाही, तर केळकरांची काय असणार, असा खोचक टोलाही ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

दरम्यान, आम्ही कुणाच्या परिवारावर बोलत नाही, फडणवीसांनी आमच्या परिवारावर बोलू नये. हो तुम्ही म्हणताय ना की कुटुंबाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी म्हणतो हो सुरू आहे, ही शिवसेना माझे कुटुंब आहे. आणि वारस्याच्या टीकेवर बोलताना माझ्या वडीलांचे अजोबा देखील प्लेगच्या साथीच्या वेळेस काम करत होते. मी नायक आहे की खलनायक आहे हे जनता ठरवेल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number